महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्रीही सुरुच

शहरातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता सुरू केलेले आंदोलन रात्रीही सुरूच आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांच्यासमोरच मागण्या मांडून आंदोलनाबाबत निर्णय घेणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

agitation-continues-for-the-night-of-the-students-of-the-agricultural-college
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्रीही सुरूच

By

Published : Jan 28, 2020, 11:36 AM IST

लातूर - शहरातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता सुरू केलेले आंदोलन रात्रीही सुरूच ठेवले आहे. जोपर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी भेट दिल्यावरच त्यांच्यासमोर मागण्या मांडून आंदोलनाबाबत निर्णय घेणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्रीही सुरूच

महाविद्यालयात काम आणि वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागले नाहीत. प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्याकडून दमदाटी होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आता कुलगुरुच प्रश्न मार्गी लावतील या भावनेतून तब्बल 300 विद्यार्थ्यांनी ठिय्या दिला आहे. दिवसभरात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मुलांची भेट घेतली असली तरी जोपर्यंत कुलगुरू भेट घेऊन आमचे गाऱ्हाणे ऐकून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. संध्याकाळचे जेवणही विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच घेतले आहे. या ठिकाणी पोलिसही दाखल झाले होते. मात्र, महाविद्यालयाच्या गेटच्या आतमध्ये आंदोलन करण्यास त्यांनी परवानगी दिल्याने हे आंदोलन सुरूच आहे. उद्या कुलगुरू विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावतात का? हे पहावे लागणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांनी मुलांना सर्व सोयी-सुविधा असल्याचे सांगितले आहे. मात्र, विद्यार्थी आपल्या भुमिकेवर ठाम आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details