महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औसा रोडवर काळी-पिवळी आणि कारमध्ये भीषण अपघात, एक ठार 12 जखमी - LATUR LATEST NEWS

लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी-पिवळी आणि औसा येथून लातूरला जाणारी कार यांच्यात औसा रोडवरील आलमला पाटीजवळ अपघात झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण 12 प्रवासी या घटनेत जखमी झाले आहेत.

औसा रोडवर काळी-पिवळी आणि कारमध्ये भीषण अपघात, 12 जखमी

By

Published : Nov 5, 2019, 1:44 AM IST

Updated : Nov 5, 2019, 10:33 AM IST

लातूर- औसा रोडवरील आलमला पाटीजवळ लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी-पिवळी जीप आणि औसा येथून लातूरला जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 3 प्रवासी गंभीर तर 8 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी-पिवळी आणि औसा येथून लातूरला जाणारी कार यांच्यात औसा रोडवरील आलमला पाटीजवळ अपघात झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली असून यात एकूण 12 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींची ओळख अद्याप पटली नसून बरेच प्रवासी निलंगा आणि औसा तालुक्यातील रहीवासी असल्याचा अंदाज आहे. कारमधील प्रवाशांना सोलापूर तर ईतरांना लातूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

औसा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

Last Updated : Nov 5, 2019, 10:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details