महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! चारचाकीने २२ किमीपर्यंत नेले फरफटत; व्हिडिओ व्हायरल - रेणापूर

ही चारचाकी अंबाजोगाईहून लातूरला जात होती. निवाडा फाट्यापासून लातूरपर्यंत चारचाकीने मृतदेहाला फरफटत नेले.

पोलीस ठाणे

By

Published : Feb 23, 2019, 8:31 PM IST

लातूर - एका व्यक्तीला धडक देऊन त्याला २२ किमीपर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार रेणापूर तालुक्यातील निवाडा येथे समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. धडक दिल्यानंतर मारहाण होण्याच्या भीतीने चालकाने पळ काढल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस ठाणे व्हीडिओ

पोलीस ठाणे व्हीडिओ

निवाडा फाट्याजवळ लातूरकडे जाणाऱ्या चारचाकीने (क्र. एम. एच. ०४ ईडी ५२५२) एका व्यक्तीला धडक दिली. या धडकेनंतर ही व्यक्ती चारचाकीच्या खाली आली. पण, चालकाने गाडी न थांबवता ती चालूच ठेवली. तब्बल २२ किमीपर्यंत त्याने गाडी चालवत नेली. यावेळी मृतदेह गाडीच्या खालच्या भागाला लटकलेला होता.


लातूर शहरातील औसा रस्त्यावरील एका रुग्णालयाजवळ हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मृताचे नाव अश्रुबा सिद्धराम मोरे असे असून, ते पोहरेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. ही चारचाकी अंबाजोगाई येथील असून, ती अंबाजोगाईहून लातूरला जात होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश शिंगणकर करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details