लातूर - एका अर्जदाराच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी तब्बल 10 हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रंगेहाथ पकडले आहे. औसा तालुक्यातील भादा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हेही वाचा - जळगावात पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या; १२ वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर आईच्या हत्येचा थरार
तक्रादाराच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी भादा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. राजशेखर कलशेट्टी यांनी 15 हजारांची मागणी केली होती. ताडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. याच दरम्यान, लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी भादा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात लाचेची रक्कम स्वीकारताना वैद्यकीय अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. मात्र, डॉक्टर कलशेट्टी यांना शारिरिक त्रास होत असल्याने त्यांना 16 तारखेला एसीबी कार्यालयात हजर होण्याबाबत नोटिस देण्यात आली आहे. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल