लातूर - खरेदी केलेल्या प्लॉटची सातबाऱ्यावर नोंद करून घेण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणारा तलाठी आणि त्याचे दोन मदतनीस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. लातूर शहरालगत असलेल्या हरंगूळ (बु) येथील प्लॉटच्या संदर्भात या लाचेची मागणी करण्यात आली होती.
हरंगूळ ग्रामपंचायतीअंतर्गत असळलेल्या प्लॉटची खरेदी तक्रारदार यांच्या आईच्या नावाने करण्यात आली होती. प्लॉट खरेदीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तक्रारदार हे तलाठी कार्यालयाला खेटे मारत होते. मात्र, तलाठी उत्तम बोयने याने त्याच्या मदतनीसामार्फत 2 हजार लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती 1 हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाच मागणी संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे कारवाईची मागणी केली. त्यानुसार लातूर शहरातील खोरे गल्ली येथे तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताना बोयने व खाजगी मदतनीस विश्वनाथ पत्रिके, राकेश राठोड यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.