महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर अक्षय देवकरचे नाव 'शाहू'च्या पहिल्या प्रवेश यादीत असते - admission

अक्षय देवकर हा मूळचा कळंब तालुक्यातील देवळाली गावचा रहिवाशी. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्याने १० वी बोर्ड परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळविले होते. त्यामुळे शाहू महाविद्यालयातच प्रवेश मिळावा ही त्याची इच्छा होती.

.... तर अक्षयचे नाव 'शाहू'च्या प्रवेश यादीत असले असते

By

Published : Jun 24, 2019, 8:03 PM IST

लातूर - शाहू महाविद्यालयाच्या प्रवेश यादीत नाव येते की नाही, या भितीने आत्महत्या केलेल्या अक्षय देवकर याचे नाव या यादीत आले असते. प्रवेश मिळविण्यासाठी अक्षयने एसइबीसीचा फॉर्म भरला नाही. म्हणजे आरक्षणाचा लाभ न घेताच त्याने हा फॉर्म भरला होता. एसईबीसी यादी ही ९३.६० टक्के लागली आहे तर अक्षय ९४.२० टक्के गुण होते. त्यामुळे पहिल्याच यादीत त्याचा नंबर लागला असता मात्र, आरक्षणाच्या लाभाचा फॉर्म भरणे त्याच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अक्षयच्या आत्महत्येबद्दलच्या निर्णयाबद्दल अधिकच हळहळ व्यक्त होत आहे.

.... तर अक्षयचे नाव 'शाहू'च्या प्रवेश यादीत असले असते

अक्षय देवकर हा मूळचा कळंब तालुक्यातील देवळाली गावचा रहिवाशी. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्याने १० वी बोर्ड परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळविले होते. त्यामुळे शाहू महाविद्यालयातच प्रवेश मिळावा ही त्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने प्रवेश फॉर्ममध्ये याच महाविद्यालयाला पसंती दिली होती. मात्र, फॉर्म भरताना त्याने मराठा आरक्षणाबद्दलचा फॉर्म भरला नव्हता. याबाबत कुणाशीही चर्चा न करता परस्पर हा निर्णय घेतला होता. हीच चूक लक्षात आल्यानेच लिस्ट लागण्या अगोदरच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. सोमवारी या महाविद्यालयाची यादी प्रसिद्ध झाली असून सर्वसाधारणसाठी ९५.२० टक्के अशी यादी लागली आहे. त्यामुळे सर्वसाधारण नाही परंतु आरक्षणातून अक्षयचा यादीत नंबर लागलाच होता. त्यामुळे शिक्षणाविषयी असलेली भीती कोणत्या टोकाला घेऊन जाते याचा प्रत्यय यावरून आला आहे. यादी पाहण्यासाठी आलेला प्रत्येकजण अक्षयचे नाव आहे की नाही याची विचारपूस करीत असल्याचे चित्र महाविद्यालयात होते.

ABOUT THE AUTHOR

...view details