महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात धक्कादायक प्रकार; सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह - सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह

शहरापासून जवळच असलेल्या धनेगाव तलावाजवळ एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

latur
सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

By

Published : Dec 24, 2019, 2:01 PM IST

लातूर - शहरापासून जवळच असलेल्या धनेगाव तलावाजवळ एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हा घातपात कुणी केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

धनेगाव तलाव

शहरापासून जवळच धनेगाव तलाव आहे. तलावालागतच सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाहणी केली असता हा एका बंद सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या सुटकेसमध्ये छिन्न-विचित्र अवस्थेत असलेल्या मृतदेहामुळे अद्याप ओळखही पटलेली नाही. घटनास्थळी लातूर ग्रामीणचे पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, पोलिसांनी बलात्कार करून हत्या केली असल्याची शंका वर्तविला आहे. या महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने सुटकेसमध्ये टाकून तलावात फेकून दिल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details