लातूर-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. मात्र, कोरोनाचा अद्याप लातूरात एकही रुग्ण आढळला नव्हाता. मात्र, आता 8 जणांना कोरानाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लातुरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
'त्या' 12 पैकी 8 जणांचा अहवाल 'पाॅझिटिव्ह' हेही वाचा-योगी सरकार बनवणार तीन पदरी खादी कापडाचे स्वदेशी मास्क, वापर सर्वांना अनिवार्य
जिल्ह्यात आतापर्यंत 76 संशयितांची तपासणी झाली होती. यामध्ये मूळचे आंध्रप्रदेश येथील निलंग्यात अडकलेले 12 जण हे जमातीसाठी आसाम, मध्यप्रदेशहून दिल्ली येथे तबलिगी मरकजच्या धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. जमातीवरुन परतत असतानाच संचारबंदी लागू झाली. त्यामुळे ते मधेच अडकले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे वास्तव्यास होते. त्यांना निलंग्यात क्वारंटाईन करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. या 12 जणांपैकी 8 जणांचे अहवाल हे पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संचारबंदी असतानाही त्यांनी तहसीलदार यांची परवानगी घेऊन निलंगा गाव गाठले होते. आता या व्यक्तींच्या संपर्कात कोण-कोण आले हे तपासणे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. खबरदारी म्हणून आता तीन दिवस निलंगा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.