लातूर : लातूर ते अंबाजोगाई रोडवर ( Latur Ambajogai Road ) क्रूझरची ट्रकला समोरासमोर धडक झाली ( Truck Cruiser Accident ) असून, या अपघातात 7 व्यक्तींचा जागीच मृत्यू तर 11 जण गंभीर जखमी झाल्याचे ( 7 Died 11 Injured In Accident ) समजते.
अपघातस्थळी रक्ताचा सडा :लातूर नजिकच्या आर्वी ( Arvi Village Latur ) येथील काही लोक अंबाजोगाई येथे खाजगी कार्यक्रमासाठी जात होते. लातूरहून निघालेली ही क्रूझर अंबाजोगाईकडे जात असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, क्रूझरमधील 7 व्यक्तींचा जागीच मृत्यू तर 11 व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातस्थळी रक्ताचा सडा व क्रूझरमधील प्रवाशांच्या शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त पडलेले होते.
महिला व लहान मुलांचा समावेश :या अपघातामुळे या मार्गावरील वाहातूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. तर काही लोक अपघातग्रस्तांना बाहेर काढताना दिसत होती. अपघातामध्ये काही महिला व लहान मुलांचा समावेश आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसून, जखमींना अंबाजोगाई येथे हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आज मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्तात्रय पवार (४०), शिवाजी पवार (४५), यश बोडके (९), श्रुतिका पवार (६), गुलाबराव सोमवंशी (५०) आणि कमल जाधव (३०) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे, रणजीत लोमटे, तानाजी देशमुख यांनी रूग्णालयात धाव घेतली. पालकमंत्री मुंडे मोबाईलवरून संपर्कात राहून सातत्याने अपडेट घेत होते. दरम्यान, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
अरूंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा :लातूरहून आलेला चौपदरी महामार्ग बर्दापूरच्या पुढे दुपदरी होऊन अरूंद होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असेलल्या बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान सतत अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. अंबासाखर येथील सभेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्ता चौपदरीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र कालौघात हे आश्वासन हवेत विरले असून निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना सुरूच आहेत. किमान तातडीने या टप्प्यात गतीरोधक तरी टाकावेत अशी मागणी होत आहे.
हेही वाचा : साखरपुड्याला जाणाऱ्या कारला अपघात, 1 जण ठार, 6 जण जखमी