निलंगा (लातूर) - जिल्ह्यात प्रत्येक दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी 6 रुग्णांची भर पडल्यानंतर सोमवारी निलंगा तालुक्यातील कोराळे एकाच गावात कोरोनाचे 6 रुग्ण आढळले.
मुंबई-पुण्याहून गावाकडे परतणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यातील लातूर, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा या तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी जिल्ह्यातून 23 नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यापैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे हे सहाही रुग्ण एकाच गावातील आहे. ते मुंबईहून परतले होते. त्यांचे रविवारी नमुने घेण्यात आले होते.