लातूर - पुण्यातून गावी परतलेल्या एकाच कुटुंबातील सहाजण हे कोरोना संशयित आहेत. त्यांची प्राथमिक तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली असून कोरोना विषाणूचे कोणतेह लक्षण त्यांच्यामध्ये आढळून आले नसल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे.
पुण्यातून लातुरात आले कुटुंब... कोरोनाच्या धसक्याने ६ जणांची तपासणी - सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला
प्राथमिक तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली असून कोरोना विषाणूची कोणतेही लक्षणे त्यांच्यामध्ये आढळून आली नसल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे.
मूळचे लातूर तालुक्यातील असलेले कुटुंब सध्या वास्तव्यास पुणे येथे होते. पुण्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने हे कुटुंब मूळ गावी येताच त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तपासणी होताच या कुटुंबांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु २४ तासांपर्यंत त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. मात्र, ही केवळ प्राथमिक तपासणी असल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी केले आहे.
हेही वाचा -काळजी घ्या ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन