लातूर - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी होत आहे. त्याचाच परिणाम कोरोना अहवालावर जाणवू लागला आहे. शनिवारी जिल्ह्यात 44 रुग्ण आढळून आले आहेत. तर 89 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गत आठवड्यात दिवसाकाठी 60 ते 65 रुग्णांची भर पडत होती.
लातूरमध्ये नव्या 44 रुग्णांची भरती, 89 जणांना डिस्चार्ज - लातूर कोरोना न्यूज
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी होत आहे. त्याचाच परिणाम कोरोना अहवालावर जाणवू लागला आहे. शनिवारी जिल्ह्यात 44 रुग्ण आढळून आले आहेत. तर 89 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे 15 ते 30 जुलैदरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या शिथिलतेनंतर पुन्हा रविवारपासून कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1 हजार 493 रुग्ण आढळून आले आहेत. पैकी 886 रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 534 जणांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी 441 पैकी 44 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लातूर शहर व तालुक्यात 14, उदगीर 6, निलंगा 3, औसा 8 तर अहमदपूर आणि देवणी तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 73 जणांना जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक रुग्ण हे लातूर शहरात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 159 खाटा वाढवण्यात आल्या आहेत. तर नमुने तपासणीची यंत्रणाही वाढवण्यात आली आहे. असे असताना दुवसरीकडे मात्र, डॉक्टरांची संख्या ही 70 एवढीच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील ताण हा कायम आहे. शनिवारच्या रुग्णसंख्येवरून लॉकडाऊनचा परिणाम समोर आला हे नक्की.