लातूर- सारोळा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात ५ ते ६ फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी मादी साप आढळून आला असता सर्प मित्रांनी त्याला पकडून जीवनदान दिले. शिवाय त्याच्या प्रसूतीनंतर साप आणि तिच्या ३० ते ३५ पिल्लांना वनविभागाच्या ताब्यात देणार आहेत.
सर्पमित्राने दिले ३५ विषारी घोणस जातीच्या सापाच्या पिलांना जीवनदान - Rajendra Kharade
लातुरातील सारोळा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात ५ ते ६ फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी मादी साप आढळला. सर्प मित्रांनी त्याला पकडून जीवनदान दिले. शिवाय त्याच्या प्रसूतीनंतर साप आणि तिच्या ३० ते ३५ पिल्लांना वनविभागाच्या ताब्यात देणार आहेत.
लातूर तालुक्यातील सारोळा येथे विषारी साप आढळून आल्याची माहिती सर्पमित्र प्रशांत जोजरे यांना मिळाली. लागलीच त्यांनी त्यांच्या चमुसह घटनास्थळी धाव घेत सापाला पकडले. त्याला ताब्यात घेतल्यावर हा साप घोणस जातीचा मादी असून ती प्रसूतीसाठी जागा शोधत असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या सापाला घरी आणून सुरक्षितस्थळी ठेवले. सकाळी त्यांच्या लक्षात आले की या मादीने ३० ते ३५ पिलांना जन्म दिला आहे. त्यांनी सर्व पिलांची योग्य काळजी घेऊन सर्व पिल्ले तसेच साप वन विभागाच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले. घोणस जातीचा हा साप अत्यंत विषारी असून याला वैज्ञानिक भाषेत रसल व्हाइपर असे म्हटले जाते. सर्पमित्राच्या समायसुचकतेमुळे या सापाला तर जीवदान मिळालेच परंतु ३५ पिल्लांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.