महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक, लातूर जिल्ह्यात 5 दिवसांमध्ये 115 कोरोना रुग्णांची वाढ - लातूर कोरोना अपडेट

बुधवारी 184 व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 174 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 140 जण निगेटिव्ह, तर तब्बल 34 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. 10 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्हमध्ये औसा 17, लातूर 12, उदगीर 2 तर अहमदपूर येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.

34 new corona positive found in latur
चिंताजनक, लातूर जिल्ह्यात 5 दिवसांमध्ये 115 कोरोना रुग्णांची वाढ

By

Published : Jul 2, 2020, 4:07 AM IST

लातूर - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून गेल्या 5 दिवसांमध्ये, जिह्यात तब्बल 115 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी औसा शहरातील 17 रुग्णांसह जिल्ह्यात 34 नवे रुग्ण आढळून आले. तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बुधवारी 184 व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 174 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 140 जण निगेटिव्ह, तर तब्बल 34 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. 10 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्हमध्ये औसा 17, लातूर 12, उदगीर 2 तर अहमदपूर येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढत आहे. यातच तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कायम आहे. सर्वकाही सुरू असून बाजारपेठेत गर्दी होत आहे. याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 387 कोरोना रुग्ण आढळून आले होते. यापैकी 206 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 168 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, लातूर शहर, औसा आणि उदगीर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.

हेही वाचा -'डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने, रितेश-जेनेलिया यांनी घेतला 'हा' कौतूकास्पद निर्णय

हेही वाचा -कर्ज बुडव्यांना माफी अन् प्रामाणिक करदात्यांवर अन्याय का? लातुरात शेतकऱ्यांचे उपोषण

ABOUT THE AUTHOR

...view details