लातूर- उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लातूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी उदगीर शहरात पहिला रुग्ण आढळून आला होता. आज ही संख्या 13 वर पोहचली आहे. त्यामुळे उदगीरकारांच्या चिंतेत भर पडत आहे.
उदगीरमध्ये आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एकूण संख्या १३वर - लातूर कोरोना पेशंट
सोमवारी उदगीर शहरात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी रुग्णांची संख्या दहा होती. सर्व रुग्णांवर शहरातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी उदगीर शहरात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी रुग्णांची संख्या दहा होती. सर्व रुग्णांवर शहरातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदीच्या नियमात शिथिलता आणण्यात आली असली तरी उदगीर शहर अपवाद आहे. शहरात 13 मे पर्यंत कर्फ्यु लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवादेखील घरपोच दिल्या जात आहेत. गेल्या दहा दिवसांत 13 रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवारी 28 व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. पैकी 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 3 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले होते. उर्वरित 4 जणांचे अहवाल हे अनिर्णित असल्याने त्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सर्वांची प्रकृती उत्तम असून दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.