महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रेमडेसिवीर'च्या काळ्याबाजाराचा लातुरात पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत तिघांना अटक - Remdesivir Seized Crime Branch Latur

कोविड 19 च्या उपचारात परिणामकारक ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

Remdesivir black market Aniket Telange arrested
रेमडेसिवीर काळाबाजार अनिकेत तेलंगे अटक

By

Published : Apr 29, 2021, 12:27 AM IST

लातूर -कोविड 19 च्या उपचारात परिणामकारक ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

अटक केल्या आरोपींचे दृश्य

हेही वाचा -लातूरच्या १०५ वर्षाच्या दाम्पत्याने कोरोनाला हरवले

लातूर शहरातील शाहू चौक ते आंबेडकर चौक दरम्यान आरोपी अनिकेत माधव तेलंगे (वय 20 रा.जानवळ, नाथनगर, लातूर) व आरोपी ओमकार भगवान शेळके (वय 26 रा.आष्टा, लातूर) यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन किंमत 10 हजार 200 रुपये आणि दोन मोबाईल किंमत 20 हजार रुपये, असा एकूण 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दोन्ही आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रत्येकी 25 हजार रुपये दराने विक्री करणार होते. या दोघांना मदत करणारा अन्य एक आरोपी, अशा एकूण तिघांवर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कलम 420, 188, 34 भारतीय दंड संहिता कलम 3, 7 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3, साथरोग नियंत्रण कायदा कलम 26, औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 कलम 18 C 27 औषधी आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, संपत फड, सुधीर कोळसुरे, बालाजी जाधव, नाना भोंग, नामदेव पाटील व अन्न व औषधी विभागाचे औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी सहभाग घेतला.

कोरोना संसर्गाच्या काळात कोणीही कोणत्याही औषधांची काळाबाजारी किंवा वाढीव दराने विक्री करू नये, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले.

हेही वाचा -लातूरचे ऑफिसर क्लब होणार कोविड केअर सेंटर

ABOUT THE AUTHOR

...view details