महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निलंग्यात लाॅकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८३ वाहनांवर कारवाई - 283 vehicle booked in nilanga

निलंगा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागावर लक्ष ठेवत निलंगा शहरात २४ तास रस्त्यावर पहारा दिला जात आहे. या अंतर्गत निलंगा पोलिसांनी वाहनांवर डबल सीट फिरणे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या जवळपास २८३ वाहनचालकांवर कारवाई करत ५३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.

निलंग्यात लाॅकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८३ वाहनांवर कारवाई
निलंग्यात लाॅकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८३ वाहनांवर कारवाई

By

Published : May 12, 2020, 10:42 AM IST

लातूर -लॉकडाऊन दरम्यान निलंगा शहरात बेशिस्त वाहन चालवणे, डबल सीट प्रवास, विनाकारण फिरणे अशा एकूण २८३ वाहनांवर निलंगा पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत एकूण ५३ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून निलंगा पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आहे. निलंगा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागावर लक्ष ठेवत निलंगा शहरात २४ तास रस्त्यावर पहारा दिला जात आहे. लॉकडाऊन दरम्यान शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रथम सर्वांना हात जोडून तर, कधी हातात फुले देऊन विनंती करण्यात आली. तरीही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना वेळेप्रसंगी पोलीसांचा खाक्याही दाखवला.

१५ एप्रिलपासून दुसर्‍या लॉकडाऊन काळात पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौकात अशोक ढोणे, मारोती महानवर, निकमसिंह चव्हाण, परमेश्वर सुर्यवंशी, अनिता सातपुते अदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना निलंगा नगरपालिकेच्या स्वाधीन केले. तर, वाहनांवर डबल सीट फिरणे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या जवळपास २८३ वाहनचालकांवर कारवाई करत ५३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. कोरोना विषाणूचे संकट अद्याप टळले नाही, ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरीच राहून स्वत:ची व कुटुंबांची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details