महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : शगुन पाहणाऱ्याकडून 20 जणांना कोरोनाचा 'प्रसाद' - Latur Corona Update

सारोळा गाव औसा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्या गावातील शगुन पाहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. याच व्यक्तीने चार दिवसांपूर्वी गावातील 20 जणांना लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारुन खाण्यासाठी दिले होते. त्यानंतर सारोळा गावातील 20 जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

Latur Corona Update
लातूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 7, 2020, 7:00 PM IST

लातूर - दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शासन आणि प्रशासन वारंवार करत आहे. मात्र, तरीही काही नागरिक अंधश्रद्धेला बळी पडून संकट ओढावून घेताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील सारोळा गावात शगुन बघण्याऱ्या एकाने लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून हे लिंबू नागरिकांना खायला दिले. त्यामुळे 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

शगुन पाहणाऱ्याकडून 20 जणांना कोरोनाचा 'प्रसाद'

सारोळा गाव औसा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्या गावातील शगुन पाहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. याच व्यक्तीने चार दिवसांपूर्वी गावातील 20 जणांना लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारुन खाण्यासाठी दिले होते. त्यानंतर सारोळा गावातील 20 जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली होती.

याबाबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रूग्ण सापडण्यामागचे कारण तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. सारोळा गावच्या पोलीस पाटलांनी याबाबत औसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details