महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय महाविद्यालयातील 17 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; 8 जण कोरोनामुक्त - लातूर कोरोना बातमी अपडेट

मागील चार महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांचा इलाज करता-करता शासकीय महाविद्यालयातील 17 जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

latur news
latur news

By

Published : Jul 18, 2020, 5:13 PM IST

लातूर - कोरोनाच्या लढाईत योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 8 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून कोरोनाच्या विळख्यातून रुग्णांना बाहेर काढणाऱ्या डॉक्टर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या 4 महिन्यापासून हे अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 17 जणांना याची लागण झाली होती. यामध्ये दहा निवासी डॉक्टर, चार प्राध्यापक, दोन नर्स (परिचारिका) आणि एका कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. 8 जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच लागण झाल्याने विभागावरील ताण वाढला आहे. रुग्णांच्या संपर्कात आल्याने ही लागण झाली असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे. मात्र, रुग्णांवरील उपचार सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details