महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळेच्या पहिला दिवशी १६०० शिक्षकांनी बांधल्या काळ्या पट्ट्या; निवृत्ती वेतन योजनेतील अन्यायाचा केला निषेध

जिल्ह्यातील तब्बल १६०० शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेत प्रवेश केला आहे. निवृत्ती वेतन योजनेत अन्याय होत असल्याने जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी या प्रकारे कामकाज करत निषेध व्यक्त केला आहे.

शाळेच्या पहिला दिवशी १६०० शिक्षकांनी बांधल्या काळ्या पट्ट्या; निवृत्ती वेतन योजनेतील अन्यायाचा केला निषेध

By

Published : Jun 17, 2019, 7:26 PM IST

लातूर - शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि शालेय साहित्याचे वाटप करून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, हे होत असताना जिल्ह्यातील तब्बल १६०० शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेत प्रवेश केला आहे. निवृत्ती वेतन योजनेत अन्याय होत असल्याने जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी या प्रकारे कामकाज करत निषेध व्यक्त केला आहे.


जिल्ह्यातील जवळपास १६०० हुन अधिक कर्मचारी हे २००५ पूर्वीपासून सेवेत आहेत. संबधित शाळांना शंभर टक्के अनुदान नसल्याने त्यांची जुन्या पद्धतीने देण्यात येणारी पेन्शन नाकारण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लाखो शिक्षकांवर अन्याय होत आहे.

शाळेच्या पहिला दिवशी १६०० शिक्षकांनी बांधल्या काळ्या पट्ट्या; निवृत्ती वेतन योजनेतील अन्यायाचा केला निषेध


२००५ पूर्वीपासून सेवेत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीने पेन्शन देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या नवीन निर्णयाचा निषेध केला आहे. शहरातील संस्कार वर्धिनी शाळेतही अशा प्रकारे निषेध करण्यात आला आहे.


यावेळी मुख्यध्यापक व संघटनेचे जिल्हाध्याक्ष प्रकाश देशमुख, सचिव बी. जी. चोले, बालाजी मुंडे, सुरज भिसे, संभाजी नवघरे, भास्कर शिंदे, कातपुरे यांनी आपल्या मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details