लातूर - कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 15 ते 30 जुलै या कालावधित पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी माहिती दिली. दरम्यान जिल्ह्यात सध्या 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दररोज 35 ते 40 नव्या रुग्णांची भर पडत आहे. शहरातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करण्याची मागणी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
लातूरमध्येही 15 दिवसांचा लॉकडाऊन ; 15 ते 30 जुलै या कालावधित अंमलबजावणी - latur lockdown news
कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 15 ते 30 जुलै या कालावधित पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे.
गेल्या 5 दिवसाची स्थिती पाहून हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. लगतच्या जिल्ह्यातही लॉकडाऊन असल्याने साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकानांवर गर्दी झाली. ग्रामीण भागातील नियमावली सोमवारी जाहीर केली जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून लॉकडाऊन करण्याची मागणी सोशल मीडियामधून केली जात होती.
15 जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी उद्या(सोमवार) पासून दारूची दुकाने बंद राहणार आहेत. दारूच्या दुकानांसमोर मद्यपींची होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासूनच दारूची दुकाने बंद राहणार आहेत. ऐनवेळीच दुकाने बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केल्याने मद्यपींमध्ये निराशेचे वातावरण आहे.