महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक : 'त्या' 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह..! - लातूर कोरोना बातमी

जिल्ह्यातील निलंगा येथील 8 जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे अहवाल काय येतील याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

दिलासादायक : 'त्या' 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह..!
दिलासादायक : 'त्या' 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह..!

By

Published : Apr 5, 2020, 8:24 PM IST

लातूर - जिल्ह्यातील निलंगा येथील 8 जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे अहवाल काय येतील याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, या सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह लातूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

जिल्ह्यात 8 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 105 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आले होते. यापैकी शनिवारी 14 जणांचे निलंगा येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते त्यांचे नमुने होते. त्यामुळे त्यांचा अहवाल काय येणार, असा प्रश्न कायम होता. मात्र, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दिलासादायक : 'त्या' 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह..!

आतापर्यंत 29 व्यक्तींच्या होम-क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे, तर 12 व्यक्तींना संस्थेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पैकी 8 जणांचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. पॉझिटिव्ह रुग्ण हे मूळचे आंध्र प्रदेश येथील असून यामध्ये लातूरच्या एकाही नागरिकाचा समावेश नाही.

नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. शिवाय शनिवारपासून पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहेत. निलंग्यात कमालीची शांतता आहे. शिवाय कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असल्याचेही अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details