लातूर- तबलिगी मरकझमध्ये सामील झालेल्या १२ लोकांच्या संपर्कात आलेल्या निलंग्यातील १४ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उस्मानाबादहून गुबाळ मार्गे सिंदखेड येथून निलंग्यात आलेल्या १२ लोकांनी शहरातील एका मशिदीत वास्तव्य केल्याची माहिती काही लोकांना समजताच त्यांनी पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवले होते. पोलिसांनी तात्काळ संबंधित बारा लोकांना ताब्यात घेतले
या १२ जणांची कोरोना चाचणी केली असता बारापैकी आठ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे, लातूर जिल्ह्यासह निलंग्यात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून निलंगा शहर आणि परिसर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहराच्या सगळ्याच रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.