कोल्हापूर - आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र आपली साथ कधी सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, आज सावलीने कोल्हापूरकरांची साथ सोडली. स्वतःची सावली गायब झाल्याचा अनुभव आज कोल्हापूरकरांना आला.
कोल्हापूरकरांनी अनुभवला झिरो शाडो-डे - खगोल तज्ञ
कोल्हापूरकरांनी आज झिरो शाडो-डे अनुभवला. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी उन्हात उभा राहिल्यानंतर सूर्य बरोबर डोक्यावर आला. त्यानंतर काही मिनिटांसाठी सावली अदृश्य झाली.
कोल्हापूरकरांनी अनुभवला झिरो शाडो-डे
दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी उन्हात उभा राहिल्यानंतर सूर्य बरोबर डोक्यावर आला. त्यानंतर काही मिनिटांसाठी सावली अदृश्य झाली. माणसाची सावली गायब होण्याच्या या प्रकाराला शून्य सावली दिवस म्हणजे झिरो शाडो-डे म्हटले जाते. यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे खगोल तज्ञ मिलींद कारंजकर यांनी.