कोल्हापूर- कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना पुराने विळखा घातला आहे. अनेक संसार या पुराच्या पाण्यात वाहाली आहे. या भागातील पूरबाधित लोकांच्या मदतीला समाजातील अनेक स्तरातील लोक सरसावत आहे. यात इचलकरंजीतील एका सामाजिक संस्थेचे बचाव पथक देखील कार्यरत होते. या पथकातील एका कार्यकर्त्याचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर : महापुरात बचावकार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा डेंग्यूने मृत्यू - kolhapur
शुभम वायसे असे मृत युवकाचे नाव आहे. इचलकरंजीतील आधार बचाव पथकामध्ये ते काम करत होते. ते कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरात बचावकार्य करत होते. या दरम्यान त्यांनी अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हालवून मोलाची मदत केली होता. पूर ओसरल्यानंतर त्यांना डेंग्यू आणि निमोनिया झाला होता. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र आजाराशी त्यांची झुंज थांबली.
शुभम वायसे असे मृत युवकाचे नाव आहे. इचलकरंजीतील आधार बचाव पथकामध्ये ते काम करत होते. ते कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरात बचावकार्य करत होते. या दरम्यान त्यांनी अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हालवून मोलाची मदत केली होता. पूर ओसरल्यानंतर त्यांना डेंग्यू आणि निमोनिया झाला होता. त्यामुळे गेल्या ८ दिवसापासून शुभम वायसे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र त्यांचा मृत्यू झाला. बाचावकार्यानंतर त्यांचा अशापद्धतीने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवाय या पथकातील अनेकांनी वायसे यांच्या जाण्याने धास्ती घेतली आहे.