महाराष्ट्र

maharashtra

राजर्षी शाहू महाराज जयंती : 'त्याने' ५ मिमीमध्ये साकारले महाराजाचे रंगीत चित्र

By

Published : Jun 26, 2020, 4:23 PM IST

चित्र कलेत हातखंडा असलेल्या अशांतला जागतिक रेकॉर्ड बनवण्याची इच्छा आहे. त्याने एक छोटासा प्रयत्न म्हणून चक्क कागदावर ५ मिमी राजर्षी शाहू महाराज यांचे रंगीत आणि पेन्सिल स्केच काढले आहे. इतकेच नव्हे तर दोन सेंटिमीटर कागदावर शहाजीराजे छत्रपती, शिवाजी महाराज आणि अंबाबाई मंदिराचे चित्र रेखाटले आहे. दोन सेंटीमीटर खडूवर श्री विठ्ठल रुक्मिणीची सुबक मूर्ती साकारली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे ५ मिमी चित्र काढण्यास त्याला दोन तास लागले.

kolhapur latest news  kolhapur rajrshi shahu maharaj sketch  राजर्षी शाहू महाराज रंगीत चित्र  कोल्हापूर लेटेस्ट न्यूज  राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष
राजर्षी शाहू महाराज जयंती : 'त्याने' ५ मिमीमध्ये साकारले महाराजाचे रंगीत चित्र

कोल्हापूर - कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. अशाच त्यांच्या प्रेमापोटी एका तरुणाने चक्क ५ मिमीवर राजर्षी शाहू महाराज यांचे रंगीत चित्र साकारले आहे. जगातील सर्वात कमी आकाराचे शाहू महाराजांचे हे रंगीत चित्र असल्याचा दावा त्या तरुणाने केला आहे.

राजर्षी शाहू महाराज जयंती : 'त्याने' ५ मिमीमध्ये साकारले महाराजाचे रंगीत चित्र

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सर्व क्षेत्रातील कार्य अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेबरोबरच राजर्षींनी साहित्य, कला, कुस्ती, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी, अशा विविध क्षेत्रात अजोड कामगिरी केली. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आज देखील प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातीलच एक अशांत मोरे. त्याला लहापणापासूनच चित्रकलेची आवड आहे. चित्रकलेचे धडे गिरवत तो मोठा झाला. कला अकादमीसारख्या संस्थेत शिक्षण घेऊन तो सध्या सायरस पुनावाला येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आतापर्यंत अशांतला राष्ट्रीय स्तरासह 120 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

कोल्हापूरच्या कसबा बावड्यात राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला होता. त्याच कसबा बावड्यात अशांत मोरेचा जन्म झाला. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांच्या कलेबद्दलची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. दोन सेंटीमीटर खडूवर शाहू महाराज यांची उभी प्रतिकृती रेखाटणे, 1 सेंटीमीटर रांगोळी काढणे, असे अनेक पराक्रम त्याने केलेत. चित्र कलेत हातखंडा असलेल्या अशांतला जागतिक रेकॉर्ड बनवण्याची इच्छा आहे. त्याने एक छोटासा प्रयत्न म्हणून चक्क कागदावर ५ मिमी राजर्षी शाहू महाराज यांचे रंगीत आणि पेन्सिल स्केच काढले आहे. इतकेच नव्हे तर दोन सेंटिमीटर कागदावर शहाजीराजे छत्रपती, शिवाजी महाराज आणि अंबाबाई मंदिराचे चित्र रेखाटले आहे. दोन सेंटीमीटर खडूवर श्री विठ्ठल रुक्मिणीची सुबक मूर्ती साकारली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे ५ मिमी चित्र काढण्यास त्याला दोन तास लागले. मात्र, ते काढण्यामागे राजर्षीचे नाव जगभर पोहोचावे इतकीच त्याची इच्छा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details