कोल्हापूर - ज्या परिसरात कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशा परिसरातील पिनकोडवर नोंदणी झालेल्या मोबाईलवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत. आजपासून हे संदेश मंत्रालयातून पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता घरीच सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पॉझीटिव्ह रुग्णाच्या परिसरातील मोबाईल धारकांना संदेश; नागरिकांनी घाबरू नये - kolhapur corona patient
आजपासून हे संदेश मंत्रालयातून पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता घरीच सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पॉझीटिव्ह रुग्णाच्या परिसरातील मोबाईल धारकांना संदेश; नागरिकांनी घाबरू नये
दुपारपासून ज्या त्या परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडू नका, असा संदेश पाठविण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या परिसरात आणखी रुग्ण सापडला अशी भीती पसरली आहे. मात्र, घाबरून जाऊ नका आपल्या परिसरात जो पूर्वी कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून हे सर्व संदेश पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिलीये. शिवाय घरी सुरक्षित राहा, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.