कोल्हापूर - महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. त्यांच्यामध्ये एक वेगळी शक्ती असते. महिला आपल्या मुलांना, कुटुंबाला सांभाळू शकतात, ऑफिसला जाऊ शकतात. पण पुरुषांनी स्वतःला हे विचारावे की, आपण स्वतः ही सर्व कामे करू शकतो का? एक दिवस पुरुषांनी ही सर्व कामे करून दाखवावी; मग आम्ही तुम्हाला मानतो, असे म्हणत सिनेअभिनेत्री रविना टंडन यांनी पुरुषांना आवाहन दिले आहे. यावेळी टंडन यांनी कोल्हापुरातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रविना टंडनने तमाम पुरुषांना दिले 'हे' आव्हान.. म्हणाली, मग मी मानते..!
जागतिक महिला दिन आज (रविवार) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच महिला दिनाचे औचित्य साधून सिनेअभिनेत्री रविना टंडन या कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांना मार्दर्शन केले.
जागतिक महिला दिन आज (रविवार) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच महिला दिनाचे औचित्य साधून सिनेअभिनेत्री रविना टंडन या कोल्हापूरमध्ये आल्या होत्या.
आम्ही जर ठरवलं तर सर्व काही करू शकतो. ही महिलांची ताकद असल्याचे म्हणत सिनेअभिनेत्री रविना टंडन यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 'चला सख्यांनो वारसा संस्कृतीचा जपुया, आणि ताकद स्त्री शक्तीची दाखवुया' या रॅलीचे टंडन यांच्या हस्ते कोल्हापुरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, पालकमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, संयोगीताराजे छत्रपती आदी उपस्थित होते.