कोल्हापूर -गणेशोत्सवात महिला वर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो त्या गौरीचे मंगळवारी आगमन करण्यात झाले. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने ढोल-ताशांच्या गजराशिवाय अगदी साध्या पद्धतीने पण भक्तिमय गौरीचे पूजन केले जात आहे. घरातल्याघरातच गौरीची गाणी म्हणत आणि खेळ खेळत महिलामंडळ आनंद लुटत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच खेळले जात आहेत गौरीचे खेळ
गौरी गणपती हा महिलांचा सर्वात आवडता सण मानला जातो. कारण गौरी आगमनानंतर महिलावर्ग एकत्र जमून पारंपरिक खेळ खेळत आनंद लुटत असतो. यानिमित्त नवीन लग्न झालेल्या मुलीही आवर्जून माहेरी येतात. यावर्षी मात्र, कोरोनामुळे गौरी आगमन साध्या पद्धतीने करावे लागले असून गौरी गीते, झिम्मा, फुगडी यासारखे खेळही घरातील महिलांमध्येच खेळावे लागत आहेत.
गौरी गणपती हा महिलांचा सर्वात आवडता सण मानला जातो. कारण गौरी आगमनानंतर महिलावर्ग एकत्र जमून पारंपरिक खेळ खेळत आनंद लुटत असतो. यानिमित्त नवीन लग्न झालेल्या मुलीही आवर्जून माहेरी येतात. यावर्षी मात्र, कोरोनामुळे गौरी आगमन साध्या पद्धतीने करावे लागले असून गौरी गीते, झिम्मा, फुगडी यासारखे खेळही घरातील महिलांमध्येच खेळावे लागत आहेत. अनेक महिलांना यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या माहेरी जाता आलेले नाही.
कोल्हापुरातील हुपरीमधील एका कुटुंबातील महिलांनी घरीच गौरी गीते, झिम्मा फुगडीसह सर्व खेळांचा आनंद लुटला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साधेपणाने आणि घरच्या घरी साजरे करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे हुपरीमधील आर्किटेक्ट दर्शना गाट यांच्या घरातील सर्वच मुली आणि महिलांनी बाहेर न जाता घरच्या घरी झिम्मा फुगडीचा आनंद लुटला.