महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 5, 2021, 4:01 PM IST

Updated : Jan 5, 2021, 8:25 PM IST

ETV Bharat / state

सॅनिटायझर वापरताना सावधान! अन्यथा बेतू शकते जिवावर

कोरोना काळात वापरलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर त्या जीवघेण्या ठरू शकतात. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. घरातील कचरा जाळताना त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

सॅनिटायझरच्या स्फोटात महिलेचा मृत्यू
सॅनिटायझरच्या स्फोटात महिलेचा मृत्यू

कोल्हापूर -कोरोना काळात वापरलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर त्या जीवघेण्या ठरू शकतात. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. घरातील कचरा जाळताना त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बोरवडेमध्ये ही घटना घडली आहे. सुनीता काशीद अस या मृत महिलेचे नाव आहे.

कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बोरवडे गावातल्या दत्तनगर मध्ये धोंडीराम काशीद हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ग्रामसेवक असलेल्या धोंडीराम काशीद यांनी कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरच्या काही बाटल्या आपल्या घरात आणल्या होत्या. 27 डिसेंबरला धोंडीराम यांच्या पत्नी सुनिता काशीद या नेहमीप्रमाणे घरातील कचरा जाळण्यासाठी बाजूच्या मोकळ्या जागेत घेऊन गेल्या. या कचऱ्याच्या ढिगात चुकून अर्धवट संपलेली एक सॅनिटायझरची बाटली देखील होती. कचऱ्यासोबत सॅनिटायझरच्या बाटलीने देखील पेट घेतला आणि या बाटलीचा स्फोट झाला. या घटनेत सुनिता 80 टक्के भाजल्या, त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले.

सॅनिटायझरच्या स्फोटात महिलेचा मृत्यू

सुनिता यांची 8 दिवस मृत्यूशी झुंज

दुर्घटनेत जखमी झालेल्या सुनिता काशीद आठ दिवस मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनाकाळात सॅनिटायझर महत्त्वाचे आहे, मात्र त्याचा वापर झाल्यावर रिकाम्या बाटल्यांची देखील व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली पाहिजे हे यानिमित्ताने समोर आले आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details