महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात मतमोजणी केंद्राबाहेर भानामतीचा प्रकार - witchkraft material Kasba Bawda

मतमोजणी केंद्रातही भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. मतमोजणी उमेदवार प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे लिंबू आणि भंडारा सापडल्याने एकच खळबळ उडाल्याचे कोल्हापुरात पाहायला मिळाले.

witchkraft material Kasba Bawda
कसबा बावडा भानामती प्रकार

By

Published : Jan 18, 2021, 3:08 PM IST

कोल्हापूर - मतमोजणी केंद्रातही भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. मतमोजणी उमेदवार प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे लिंबू आणि भंडारा सापडल्याने एकच खळबळ उडाल्याचे कोल्हापुरात पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करताच कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. शिवाय संबंधिताकडून पोलिसांनी लिंबू आणि भंडारासुद्धा काढून घेतला. कसबा बावडा इथल्या रमणमळा परिसरातील मतमोजणी केंद्राबाहेर ही घटना घडली.

कोल्हापुरात मतमोजणी केंद्राबाहेर भानामतीचा प्रकार

हेही वाचा -सुरक्षेची काळजी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय - वर्षा गायकवाड

मतदानाच्या दिवशीसुद्धा असे प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यात मतदानादिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात भानामतीचे प्रकार समोर आले होते. अनेकांनी तर मतदान केंद्राबाहेरच लिंबू आणि उतारे टाकल्याचे दिसून आले होते. त्यामुळे, अनेकांनी याबाबत तक्रारी सुद्धा केल्या होत्या. त्यानंतर आता मतमोजणीवेळीसुद्धा भानामतीचे प्रकार समोर आल्याने याबाबत सर्वत्र चर्चा आहे.

वारंवार भानामतीचे प्रकार

खरतर पुरोगामी जिल्ह्यात आजपर्यंत नेहमीच चांगल्या पद्धतीने प्रत्येक निवडणूक प्रक्रिया पार पडत असते. मात्र, गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात भानमतीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळीसुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बंगल्याबाहेर अज्ञात व्यक्तीने काळी बाहुली आणि लिंबू ठेवल्याचे समोर आले होते. आणि आता सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हे प्रकार समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -मुलीच्या जन्माचा आनंद, हत्तीवरुन मिरवणूक काढत मुलीचे स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details