कोल्हापूर- महापूर आणि दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याच्या बाबतीत भाजपने शेतकऱ्यांची अक्षम्य अशी गळचेपी केली आहे. गेल्या पाच वर्षात फक्त आश्वासनच देत आले आहेत. पण, आत्ताचे जे तीन पक्ष सत्ता स्थापन करू पाहत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनावर विश्वास ठेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल आहे.
...म्हणूनच महाविकास आघाडीला पाठिंबा दिला - राजू शेट्टी
याबाबत राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, सत्ता स्थापनेबाबत अनेक अशा घडामोडी घडल्या आहेत. आज सकाळी आम्हाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुंबईला येण्यासाठी निरोप आल्याने आम्ही मुंबईला रवाना झालो. थोड्याच वेळात आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी

हेही वाचा-चळवळीला तगडा व्यक्ती मिळाला तर आनंदाने बाजूला होईन; राजू शेट्टींची भावनिक साद