कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली असून राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. पळवापळवीच्या राजकारणालाही ऊत आला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?
राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ किंवा शाहुवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आघाडीच्या घटक पक्षांकडून आणि राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
आघाडीच्या घटक पक्षांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडणार असल्याची माहिती आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी हेच घटक पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या
दरम्यान, राजू शेट्टी यांनी नुकतेच चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा माझा विचार आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे राजू शेट्टी स्वत:हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार की नवीन चेहऱयांना संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
हेही वाचा - हमें नया कश्मीर बनाना है, मोदी बोलले लोक उसळले