महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोडोलीमध्ये विहीर खचून 3 जण गाडले गेले तर तिघे बचावले... - kolhapur well collapsed

पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात विहीर खचल्यामुळे 6 जण गाडले गेले होते. यांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तिघेजण अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बुल्डोजरच्या साहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

well collapsed
पन्हाळामध्ये विहीर कोसळून 6 जण गाढले गेले; दोघांना वाचवण्यात यश तर चौघांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू

By

Published : May 9, 2020, 9:52 PM IST

Updated : May 9, 2020, 11:42 PM IST

कोल्हापूर -पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात विहीर खचल्यामुळे 6 जण गाडले गेले होते. यांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तिघेजण अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बुल्डोजरच्या साहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.

कोडोलीमध्ये विहीर खचून 3 जण गाडले गेले तर तिघे बचावले, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू..

दोन बुल्डोजर आणि एका क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. विहिरीचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अमोल सदाकळे, सिकंदर जमादार आणि विहीर मालक वारकरी हे तिघे अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर, जखमींमध्ये नेताजी पाटोळे, बापू संजय यशवंत यांसोबत आणखी एकाचा समावेश आहे.

Last Updated : May 9, 2020, 11:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details