कोल्हापूर -शहरासह जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हातील सर्वच नद्यांना महापूर आला आहे. पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
कोल्हा'पूर'मध्ये जलप्रकोप, पंचगंगेची पाणी पातळी अद्यापही ५४.६ फूटावर - पंचगंगा नदीला पूर
पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
शहरात पंचगंगेचे शिरलेले पाणी
पुरामुळे निम्मे शहर आणि अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे २२७ गावांमधील १ लाख ७ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुरामुळे नदीची पाणी पातळी अद्यापही ५४.६ फूटावर आहे. सततच्या पावसामुळे कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे.