कोल्हापूर - राज्यातला 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. 47 ग्रामपंचायतींनी यापूर्वीच बिनविरोध निवडणुकीची घोषणा केल्याने प्रत्यक्षात 386 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 386 गावांमध्ये आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतची अधिक माहिती दिली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर निवडणुका होत आहेत. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर प्रत्येक मतदाराचे स्क्रिनिंग केले जात आहे. शिवाय प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 720 सदस्यांची बिनविरोध निवड तर 'इतके' उमेदवार रिंगणात -