महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Grampanchayat Election : कोल्हापूरातील 430 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, पाहा ग्राउंड रिपोर्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान सुरु आहे. (Kolhapur Grampanchayat Election). पाहा काय आहे तेथील मतदानाची स्थिती या ग्राउंड रिपोर्ट द्वारे..(Voting for 430 Gram Panchayats in Kolhapur).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 18, 2022, 1:30 PM IST

पाचगावमधून ग्राउंड रिपोर्ट

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. (Voting for 430 Gram Panchayats in Kolhapur). या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदार मोठ्या रांगा लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या पाचगाव या गावात कशा पद्धतीने मतदान पार पडते आहे, पाहा याबाबतचा सविस्तर आढावा ईटीव्ही भारतवर.. (Kolhapur Grampanchayat Election)

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी :

  • निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती - 474
  • बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - 44
  • बिनविरोध सरपंच झालेली उमेदवार - 60
  • बिनविरोध सदस्य झालेली उमेदवार - 874
  • प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत - 430
  • सरपंच पदासाठी रिंगणातील उमेदवार - 1193
  • सदस्य पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार - 8995
  • एकूण मतदान केंद्र - 2015
  • एकूण मतदान कर्मचारी - 11075
  • एकूण पोलीस कर्मचारी - 3000

जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 204 अर्ज आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील 50 तालुक्यातील 260 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 303 अर्ज आहेत. शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी 122 अर्ज आहेत. गगनबावडा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 81 अर्ज दाखल आहेत. कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल झाले आहेत. आजरा तालुक्यात 36 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल आहेत. चंदगडमधील 40 ग्रामपंचायतींसाठी 170 अर्ज दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details