सांगली - जिल्ह्यामध्ये लवकरच शेतीमालाच्या रेसिड्यूवर संशोधन करणारे अद्यावत केंद्र उभारले जाणार, असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत स्थिर आहे. हे सरकार 5 वर्ष टिकेल, असा विश्वासही सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यात लवकरचं अद्यावत रेसिड्यू संशोधन केंद्र - विश्वजित कदम 64 हजार 280 जणांचा पहिला डोस पूर्ण -
सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना मंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण सुरू असून आतापर्यंत एकूण ६४ हजार २८० जणांनी पहिला डोस तर १२ हजार ४४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे हे प्रमाण राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी, अश्या सूचना देत जनतेनेही या नियमांचं पालन करावे, असे आवाहन कदम यांनी यावेळी केले.
रेसिड्यूवर संशोधन केंद्र उभारणार -
सांगली जिल्ह्यामध्ये डाळींब, द्राक्ष यासह इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, त्यामुळे लवकरच शेतीमालाच्या रेसिड्यूवर संशोधन करणारे अद्यावत केंद्र उभारले जाणार, असल्याची घोषणा मंत्री कदम यांनी केली. बरोबर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर कोणी शंका घेण्याचे कारण नाही, त्यांचे काम हे नेहमीच चांगले राहिले आहे. जागतिक पातळीवरही कौतुक झालेला आहे, असे स्पष्ट करत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून पाच वर्ष टिकेल असा, विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.