महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 17, 2019, 12:12 PM IST

ETV Bharat / state

व्हिडिओ : चिमुकली शाळेला जायला झाली आतुर

सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिमुकली पहिल्या दिवशी शाळेला जाण्यासाठी किती आतुर आणि उत्साही झाली आहे, हे दिसून येत आहे.

चिमुकली शाळेला जायला झाली आतुर

कोल्हापूर- उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाले आहेत. शाळेला जायचे म्हटले, की लहान मुलांचे रडणे सुरूच असते. परंतु, सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिमुकली पहिल्या दिवशी शाळेला जाण्यासाठी किती आतुर आणि उत्साही झाली आहे, हे दिसून येत आहे.

चिमुकली शाळेला जायला झाली आतुर, पाहा व्हिडिओ

आपल्या आई-वडिलांना सोडून शाळेत जाताना हमखास लहान मुलांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात. पण एक चिमुकली पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी उत्साही असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आराध्या असे या चिमुकलीचे नाव आहे. शाळेला जाण्यासाठी आई-वडिलांनी नवनवीन वस्तू आणून दिल्यानंतर तिला झालेला आनंद या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आजपासून राज्यातील जिल्हापरिषद, मनपा, नगरपालिका, खाजगी अनुदानित, विनाअनुदानितसह तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत. त्यासाठी अनेक शाळांनी या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारीसुद्धा चांगल्या पद्धतीने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details