कोल्हापूर- गेल्यावर्षीच्या महापुरात कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज परिसर, कसबा बावडा, खानविलकर पेट्रोल पंप हा परिसर पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याने परिसरातील असंख्य गाड्या पाण्यात गेल्या होत्या. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसला होता. कोल्हापूरच्या नागरिकांनी गेल्यावर्षीच्या महापुराची धास्ती घेऊन व ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली. दसरा चौक ते कसबा बावडा या मार्गावर जवळपास तीन किलोमीटरपर्यंत या चारचाकी गाड्यांचे पार्किंग करण्यात आले होते. जेणेकरून पुन्हा महापुरात आपल्या गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून कोल्हापूरकरांनी घेतलेली ही खबरदारीच म्हणावी लागेल.
कोल्हापूरकरांची अशीही 'सावधगिरी', पुराच्या पार्श्वभूमीवर घेतली खबरदारी - कोल्हापूर पूरस्थिती
दसरा चौक ते कसबा बावडा या मार्गावर जवळपास तीन किलोमीटरपर्यंत या चारचाकी गाड्यांचे पार्किंग करण्यात आले होते. जेणेकरून पुन्हा महापुरात आपल्या गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून कोल्हापूरकरांनी घेतलेली ही खबरदारीच म्हणावी लागेल.
गतसाली आलेल्या महापुरात कोल्हापूरकरांचे प्रचंड नुकसान झाले होते. कसबा बावडा, महावीर कॉलेज परिसर, खानविलकर पेट्रोलपंप, नागाळा पार्क या परिसरात रात्री पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली होती. त्याचबरोबर परिसरात असणाऱ्या शेकडो चारचाकी-दुचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. चार दिवस पुराचे पाणी या परिसरात साचून असल्याने प्रचंड नुकसान झाले होते. यंदादेखील कोल्हापुरात महापुराची परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्यावर्षीच्या महापुराची धास्ती आजदेखील कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आहे. गेल्यावर्षीसारखी परिस्थिती यावर्षीही उद्भवू नये, म्हणून कोल्हापुरातील या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी आपली चारचाकी मुख्य रस्त्यावर पार्क केली होती. जवळपास खानविलकर पेट्रोल पंप ते पोलीस मुख्यालय अशा तीन किलोमीटर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गेल्यावर्षीच्या महापुराची धास्ती घेऊनच कोल्हापूरकरांनी ही खबरदारी घेतली आहे, असेच म्हणावे लागेल.