महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत Exclusive : कोल्हापुरात चक्क 'टॉयलेट'सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा! - कोल्हापुरात टॉयलेटसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा

'व्हेलनटाईन डे' च्या निमित्ताने कोल्हापुरात महिलांनी चक्क शौचालयावर आपले प्रेम व्यक्त केले आहे. नेहमीच उघड्यावर शौचाला जावे लागणाऱ्या महिलांच्या घरी स्वतःचे शौचालय बनल्यानंतर समाधान व्यक्त करत त्यांनी रांगोळी काढून फुलांची आणि फुग्यांची सजावट शौचालयाला केली.

टॉयलेटसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा
टॉयलेटसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा

By

Published : Feb 15, 2020, 10:55 PM IST

Updated : Feb 15, 2020, 11:50 PM IST

कोल्हापूर -अभिनेता अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' चित्रपट सर्वांना माहीत असेल. सत्य घटनेवर आधारित तो चित्रपट होता. चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने लग्न झाल्यानंतर तिची पत्नी घरात शौचालय नाही म्हटल्यावर घर सोडून जाते आणि तो घरात शौचालय बांधतो तेव्हाच ती घरी परत येते. त्यावेळी अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण सर्वांनी पहिलाय. असाच काहीसा आनंद कोल्हापुरातील झोपटपट्टी वस्तीत राहणाऱ्या महिलांना झाला आहे. विशेष म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने त्यांनी चक्क टॉयलेटवर आपले प्रेम व्यक्त केले आहे.

टॉयलेटसोबत अनोखा व्हॅलेंटाईन डे साजरा

'जगात भारी' अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात कोल्हापूरकर नेहमीच काहीतरी खास करत असताना आपण पाहिले आहे. आता हेच बघा ना, 'व्हेलनटाईन डे' च्या निमित्ताने चक्क शौचालयावर महिलांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. शलटर या सामाजिक संस्थेने यादवनगर झोपडपट्टीमध्ये टॉयलेट उभारून स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावला होता. नेहमीच उघड्यावर शौचाला जावे लागणाऱ्या महिलांच्या घरी स्वतःचे शौचालय बनल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे शौचालया प्रती अगदी रांगोळी काढून फुलांची आणि फुग्यांची सजावट करत कृतज्ञता पूर्वक प्रेम यातून व्यक्त करण्यात आले आहे. कोल्हापूरकरांच्या या टॉयलेटवरील अनोख्या प्रेमाची आता सर्वत्र चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Last Updated : Feb 15, 2020, 11:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details