कोल्हापूर - पुणे परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात एकूण 117 सापळा रचून कारवाया केल्या असल्याची माहिती पुणे परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिली. दक्षता जनजागृती सप्ताहबाबत माहिती देण्यासाठी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, पुणे परिक्षेत्राचे दक्षता जनजागृती सप्ताह मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा आणि सर्वसामान्य जनतेला कोणत्याही पद्धतीने सरकारी कार्यालयातील कामे पूर्ण होण्यामध्ये अडथळा येऊ नये, याबाबत या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शिवाय जास्तीत जास्त तक्रारदार तक्रारीसाठी समोर यावेत यासाठी सुद्धा जनजागृती केली जात असल्याचेही नाडगौडा यांनी म्हटले आहे.