कोल्हापूर :अमित शाहांच्या दौऱ्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर शहराला पोलिसांच्या छावणीचे रुप आले आहे.अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून पोलिसांचे विशेष पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. तर कालपासूनच अमित शाह ज्या ठिकाणांवर भेट देणार आहेतl त्या ठिकाणी कोल्हापूर पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून पाहणी करण्यात आली. वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.
अमित शाह यांचा असा असणार दौरा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे येणार आहेत. दुपारी 1.45 ते 2.15 पर्यंत ते श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी 2.30 ते 2.35 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून ते दुपारी 2.40 वाजता हॉटेल पंचशील येथे येणार आहेत. दुपारी 3.15 ते 4.30 पर्यंत अमित शाह यांच्या पत्नी शिकलेल्या एज्युकेशन ट्रस्टच्या एस एम लोहिया हायस्कूलच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तेथून ते सायंकाळी 5 वाजता नगाळा पार्क येथील भाजपच्या नूतन कार्यालयाची पाहणी करणारा आहेत. रात्री 8 वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक ही घेणार आहेत. तेथून रात्री 9.30 वाजता ते विमानाने दिल्लीकडे जाणार आहेत.
कोल्हापूर शहराला छावणीचे स्वरूप : दोन दिवसांपासून दिवसभर कोल्हापूर पोलीस व केंद्रीय पोलीस दलाकडून संयुक्तपणे दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळा, न्यू एज्युकेशन सोसायटीचा पेटाळ्यावरील कार्यक्रम, विमानतळ आदी ठिकाणांवर पाहणी करण्यात आली. असून बंदोबस्ताठी दुसऱ्या जिल्ह्यातून ही मोठा फौजफाटा मागवण्यात आला आहे. सुमारे 500 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कोल्हापुरात दाखल झालेत. आज शिवजयंती असल्याने कोल्हापूर शहरातील प्रमुख एकेरी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, कणेरी मठ शोभायात्रा, जोतिबा खेटे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे आज प्रमुख ठिकाणी एकेरी मार्ग दुहेरी करण्यात येत आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उद्या शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने कोल्हापूर विमानतळ परिसर आणि संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास बंदी घालण्यात आली आहे. विनाकारण बाहेर पडू नका. अत्यंत गरजेचे असले तर आपले आधार कार्डजवळ बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.