कोल्हापूर - अलीकडे दिवसेंदिवस झाडांच्या कत्तलीचे प्रमाण वाढत असतानाच करवीर तालुक्यातील सांगरूळच्या जोतीबा डोंगरावर 'वृक्ष अर्पण' मोहिमेअंतर्गत उमेद फाऊंडेशन ने लोकसहभागातून झाडे लावली आणि त्यांच्या संवर्धनावरही लक्ष केंद्रित केले. यासोबतच झाडांना ४ वर्ष पूर्ण झाल्यावर मोठ्या उल्हासात त्यांचा वाढदिवस साजरा करत समाजापूढे "झाडे लावा, झाडे जगवा" च्या माध्यमातून सुंदर उदाहरण प्रस्तुत केले आहे.
करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील जोतिबा डोंगरावर 'वृक्ष अर्पण' मोहिमेतून उमेद फाउंडेशनने लोकसहभागातून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवली. या झाडांना आता ४ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.