महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविद्यालय सुरू करण्याबाबत सर्वांना विचारात घेऊन लवकरच निर्णय घेऊ - उदय सामंत - कॉलेज पुन्हा कधी सुरू होणार न्यूज

महाविद्यालय सुरू करण्याबाबत अनेक संघटनांमध्ये मतप्रवाह आहेत. मात्र सर्वांना विचारात घेऊन लवकरच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

uday samant said We will take a decision soon reopen a colleges
महाविद्यालय सुरू करण्याबाबत सर्वांना विचारात घेऊन लवकरच निर्णय घेऊ - उदय सामंत

By

Published : Jan 26, 2021, 10:03 AM IST

कोल्हापूर- महाविद्यालय सुरू करण्याबाबत अनेक संघटनांमध्ये मतप्रवाह आहेत. मात्र सर्वांना विचारात घेऊन लवकरच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. तसेच सीमाभागात शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने सकारात्मक प्रयत्न केले आहेत. या शैक्षणिक संकुलास मूर्त स्वरुप येत असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा एकर जागा निश्चित करून देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार त्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

उदय सामंत बोलताना...

कोल्हापूर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाची येथून सुरुवात करण्यात येत आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सातवा वेतन आयोग अथवा वेतन निश्चितीच्या २३८ प्रकरणांपैकी २२० प्रकरणे निकाली निघाली आहेत. अनुकंपा तत्त्वावरील ४१ प्रकरणे आली होती, त्यातील ३४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. वेतन देयकात नाव समाविष्ट करण्याबाबत ८५ प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यातील ८० निकाली निघाली आहेत. सेवानिवृत्ती वेतनाची ५३५ प्रकरणांपैकी ४९२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सेवानिवृत्ती उपदानाच्या ४०८ प्रकरणांपैकी ३४१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची १४६ प्रकरणे प्रलंबित होती, त्यापैकी ९६ निकाली निघाली आहेत. अर्जित रजा रोखीकरणाच्या ५५ पैकी ४३ निकाली निघाली आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या ४९० पैकी ४३३ निकाली, स्थाननिश्चितीच्या ६४७ पैकी ४८५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यांसह तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन, वैद्यकीय देयके यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणेही मार्गी लागल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

या उपक्रमानंतर सामंत यांनी पत्रकार बैठक घेत या उपक्रमात निपटारा करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती दिली. त्याचबरोबर सीमा भागात शैक्षणिक संकूल सुरू करण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील असून, त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी दहा एकर जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमा भागातील नवीन शैक्षणिक संकुलात व्यावसायिक उभ्यासक्रमांना सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेता येणार नाही, त्यांच्यासाठी सीमाभागातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तीन केंद्रे सुरू केली जाणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्याचं नियोजन येत्या काळात केलं जाणार आहे. शिवाय विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रासाठी जाहीर केलेला एक कोटी रुपयांचा निधी येत्या 15 दिवसांत प्रदान करू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अध्यासन सुरू केले जाणार असून, त्याला कुलगुरू व कुलसचिवांनी संमती दिल्याचंही सामंत म्हणाले. तसेच ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचा व शासनमान्य ग्रंथालयीन कर्मचार्यांना शासकीय ओळखपत्र देण्याच्या योजनेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आल्याचे सामंत यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. पत्रकार बैठकीला आमदार प्रकार आबिटकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details