कोल्हापूर- आज सकाळपासून जिल्ह्यात दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईहून कर्नाटकात आपल्या मूळ गावी जात असताना किनी टोल नाका येथे पकडलेल्या कंटेनरमधील 42 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर इचलकरंजी येथील एका साठ वर्षाच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे, आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
कोल्हापुरात आढळले आणखी 2 कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या नऊ - कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या
मुंबईहून कर्नाटकातील मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांना 16 एप्रिलला किनी टोलनाका येथे अडवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. या प्रवाशांचे स्वॅब 17 एप्रिलला घेतले होते. त्यातील एका प्रवाशाचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईहून कर्नाटकातील मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांना 16 एप्रिलला किनी टोलनाका येथे अडवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. या प्रवाशांचे स्वॅब 17 एप्रिलला घेतले होते. त्यातील एका प्रवाशाचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय इचलकरंजीतील व्यक्तीचा स्वॅबदेखील 17 एप्रिलला घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज सकाळी आयजीएम रुग्णालयाला प्राप्त झाला.
इचलकरंजी येथे लॉकडाऊन अगदी कडक पाळले जात आहे, असे असतानाही बाधित व्यक्ती नेमका कोणाच्या संपर्कात आला याबाबतची माहिती घेतली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी ही माहिती दिली.