कोल्हापूर -विहिरीवरून कपडे धुवून घरी परत येत असताना अंगावर विजेची तार पडून मायलेकराचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बाचणी गावात सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गीता गौतम जाधव (वय 38) आणि हर्षवर्धन गौतम जाधव (वय 14) अशी या मायलेकांची नावे असून यामध्ये 10 वर्षांची मुलगी मात्र बचावली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणीकरून याबाबत नोंद केली आहे.
सुदैवाने 10 वर्षांची लेक बचावली-
कोल्हापूर : विजेची तार अंगावर पडून माय-लेकराचा मृत्यू - कोल्हापूर कागल आईमुलाचा मृत्यू
कपडे धुवून परत येत असताना वाटेतच त्यांच्या अंगावर शेतातील खांबावरील महावितरणची प्रवाहित विद्युत तार अंगावर पडली. विजेच्या धक्क्याने आई आणि 14 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 10 वर्षांची मुलगी मात्र सुदैवाने बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील बाचणी गावातील गीता गौतम जाधव या नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतातील विहिरीवर आपल्या मुलासह कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवून परत येत असताना वाटेतच त्यांच्या अंगावर शेतातील खांबावरील महावितरणची प्रवाहित विद्युत तार अंगावर पडली. विजेच्या धक्क्याने आई आणि 14 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 10 वर्षांची मुलगी मात्र सुदैवाने बचावली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी-
दरम्यान, घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत कागल पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमध्ये लहान मुलासह आईचा मृत्यू झाल्याने जाधव परिवारासह गावावर शोककळा पसरली आहे.