महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2020, 7:42 PM IST

ETV Bharat / state

आनंदाची बातमी : रुग्णसंख्येत घट झाल्याने कोल्हापूरातील दोन कोविड केअर सेंटर बंद

गेल्या एक आठवड्यापासून कोल्हापुरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्रमांक 1 आणि 2मधील दोन कोविड सेंटर बंद करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली आहे.

two-covid-center-closed-in-kolhapur
आनंदाची बातमी : कोल्हापूरातील दोन कोव्हीड केअर सेंटर बंद; रुग्णसंख्येत घट होत चालल्याने घेतला निर्णय

कोल्हापूर - कोल्हापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत चालला आहे. त्यामुळे कोल्हापूरातील महापालिका संचलित दोन कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली आहेत.

गेल्या एक आठवड्यापासून कोल्हापुरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळेशिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्रमांक 1 आणि 2 मधील दोन कोविड सेंटर बंद करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली आहे. तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. जिल्ह्यात आज सात हजारांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र शहरातील विचार केल्यास रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत चालली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 12 कोविड केअर सेंटर आहेत. त्यातील शिवाजी विद्यापीठमध्ये एकूण 4 सेंटर होती. त्यातील 2 सेंटर बंद करण्यात आली असून 10 सेंटर अजूनही सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details