कोल्हापूर - कोल्हापुरात बुधवारी रात्री 8 पासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत आणखी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 20 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक इचलकरंजी शहरातील 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय जिल्ह्यात आणखी 15 रुग्णांची वाढ झाली असून 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 1 हजार 51 रुग्णांपैकी 790 जणांना डिस्चार्ज तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूरमध्ये सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 241 इतकी झाली आहे. आज (गुरुवारी) मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये इचलकरंजी येथील 81 वर्षांच्या एका वृद्धाचा तर भुदरगड येथील 71 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. शिवाय वाढलेल्या 15 रुग्णांमध्ये गडहिंग्लज, करवीर आणि पन्हाळा तालुक्यासह इचलकरंजी येथील प्रत्येकी 2 रुग्ण तर शिरोळ, शाहूवाडी आणि इतर राज्यातील प्रत्येकी 1 अशा 15 जणांचा समावेश आहे. दरम्यान, कोल्हापूरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. शिवाय मृत्यूंची सांख्य सुद्धा वाढत चालली असून, कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.