कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरुच आहे. आज(गुरुवार) सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 12 रुग्ण वाढले आहेत. तर, एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 880 वर पोहोचली आहे. त्यातील 726 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत एकूण 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, सद्यस्थितीत रुग्णांची संख्या 142 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोल्हापुरात दररोजच 15 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह कोल्हापूरकरांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे.
चिंताजनक! कोल्हापुरात आज आणखी 12 रुग्ण वाढले; रुग्णांची संख्या 142 वर - कोल्हापूर कोरोना आकडेवारी
आज जिल्ह्यात आणखी 12 रुग्ण वाढले असून एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. तसेच इतर जिल्हा व राज्यातील 18 असे मिळून जिल्ह्यात एकूण रुग्णांची आजअखेर संख्या 880 झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 880 पॉझीटिव्ह रुग्णांपैकी 726 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 142 इतकी आहे.
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा - 81
भुदरगड - 76
चंदगड - 94
गडहिंग्लज - 105
गगनबावडा - 7
हातकणंगले - 16
कागल - 57
करवीर - 26
पन्हाळा - 29
राधानगरी - 69
शाहूवाडी - 186
शिरोळ - 10
नगरपरिषद क्षेत्र - 49
कोल्हापूर महापालिका क्षेत्र - 47
एकूण 862
तसेच इतर जिल्हा व राज्यातील 18 असे मिळून जिल्ह्यात एकूण रुग्णांची आजअखेर संख्या 880 झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 880 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 726 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 142 इतकी आहे.